“शाहू महाराजांना पत्र.” प्रति… छत्रपती शाहू महाराज यांच्या सेवेशी… दत्तकविचा मानाचा मुजरा. राजे… परवा तुमची जयंती होती म्हणून.. what’s up ,face book वर तुमचं गुणगान चाललं होतं. मानाचे मुजरे झडत होते. गुलाब पुष्पांच्या हारांनी काल तुम्ही सजला होता फोटोत. म्हणून मी परवा काही बोललो नाही. घोषणांनी साऱ्या शाळा,कॉलेजेस दुमदुमले होते. तोंड पाडून काहींनी तुमच्यावर भाषणंही