मी आहे ट्रोल


मी आहे ट्रोल

वाचनीय मराठी पुस्तक लेखिका -स्वाती चतुर्वेदी.

अनुवाद – मुग्धा कर्णिक

भाजपच्या डिजिटल सैन्याच्या रहस्यमय जगात हे पुस्तक मुग्ध कर्णिक यांनी अनुवाद करून सर्व मराठी रसिकांना सदर केले आहे.

 

No automatic alt text available.

 

पुस्तकाविषयी लोकसत्तामधून

भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने अभिनेता अमिर खानला स्नॅपडीलच्या ब्रँड अॅम्बेडर पदावरून काढण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरू केली होती, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला होता. याच पुस्तकातून आता नवी माहिती समोर येत आहे. भाजपने विरोधी पक्षांचे नेते, गांधी परिवार, पत्रकार आणि चित्रपट कलाकारांची ट्विटरवर खिल्ली उडवण्यासाठी एक वेगळी टीम बनवण्यात आली होती, असे म्हटले आहे. पत्रकार स्वाती चतुर्वैदी यांनी ‘अॅम अ ट्रोल’ हे पुस्तक लिहिले आहे. स्वाती यांनी भाजपच्या आयटी सेलच्या माजी कायकर्त्या साध्वी खोसला यांच्या हवाल्याने पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. भाजपने स्वंयसेवक आणि कर्मचाऱ्यांना काही पत्रकारांची एक हिटलिस्ट देऊन त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ला करण्यास सांगितले होते. गांधी परिवाराचा पर्दाफाश करणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हा त्यांचा हेतू होता. जर कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनावश्यक बाबींचा उल्लेख होईल. तिथे डिजिटल ट्रॅकिंग टूल्सच्या साहाय्याने दुरूस्ती केली जात, असेही म्हटले आहे.

डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार या पुस्तकात लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी खोसला यांचे चंदीगढच्या भाजपच्या उमेदवार किरण खेर यांच्याबरोबर ‘चाय पर चर्चा’ कार्यक्रमातील एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. तर अरविंद गुप्ता यांनी साध्वी खोसला या आमच्याबरोबर कामच करत नव्हत्या. एका कार्यक्रमात त्या मला भेटल्या. त्यांनी तेथे मला एक प्रोजेक्ट मागितला होता. तो त्यांना दिला नाही. खोसला या पंजाबमध्ये काँग्रेसबरोबर काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या आयटी सेलची प्रतिष्ठा आणखी वाढली आणि रोज नव्या लोकांना शोधून त्यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला, असे पुस्तकातील ‘द बीजेपी कनेक्शन’ या लेखात लेखिका चतुर्वेदी यांनी खोसला यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपची सोशल मीडिया टीम वाढवण्यात येत आहे. याबाबत खोसला यांनी भाजपचे राम माधव आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासमोर चिंताही व्यक्त केली होती, असा दावा केला आहे. परंतु राम माधव यांनी सकारात्मक गोष्टीकडे लक्ष दे, या बाबींकडे दुर्लक्ष कर असे म्हटले होते. त्याचबरोबर साध्वी हे तुझं नाव खूप चांगलं आहे, असेही ते म्हणाले होते. काही संस्था विरोधी पक्षाविरोधात ट्रेंड चालवण्यासाठी पैसेही देतात असे खोसला यांनी सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ७ ट्विट केल्यानंतर ४० रूपये अशा संस्थांना दिले जातात.

‘आय अॅम अ ट्रोल’ या स्वाती चतुर्वेदी यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला असून हे पुस्तक मधुश्री प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. यातून या पुस्तकाचे आणि इंटरनेट ट्रोल्सचे अंतरंग समजून घ्यायला मदत होईल.

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

मी शोधपत्रकारिता करत आलेय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही माझी रोजीरोटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारने माझ्याविरुद्ध आणि माझ्यासारख्या इतर अनेक भारतीय पत्रकारांवर शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल खटले भरले आहेत. मी त्याविरुद्ध व्यवस्थित लढा दिला आणि मी ज्या प्रकाशनांमध्ये काम करत होते त्यांनी माझी साथही दिली.

१० जून २०१५मध्ये मी दिल्लीच्या वसंत विहार पोलीस ठाण्यात एका निनावी ट्वीटर हँडलविरुद्ध (@Lyutensinsider) एफआयआर नोंदवला. ‘ल्यूटेन्सइनसाइडर’चे चाळीस हजार फॉलोअर्स होते आणि त्यांनी मला त्याआधीच्या सहा महिन्यांपासून पद्धतशीरपणे लक्ष्य केले होते. अत्यंत गलिच्छ, विखारी बदनामीची मोहीम चालवून माझे एका राजकीय नेत्याशी लैंगिक संबंध असल्याचे पसरवले जात होते.

रोज सकाळी उठल्यानंतर मला शंभर-एक नोटिफिकेशन्स येत असत. माझा ‘दर’ काय आहे, ‘काल रात्री मी काय मस्त, धमाल सेक्स केला’ आणि मग काल्पनिक प्रसंग रचून ‘किशोरांशी सेक्स करण्याचे वेड असलेली मी’ कशी ‘आणखी, आणखी हवं’ म्हणून सेक्स मागत राहिले याची वर्णनं घातली जात होती. होय, सार्वजनिक व्यासपीठावर माझ्या चारित्र्याची वर्णने पुढल्या पिढ्यांसाठी केली जात होती. मला अतिशय अभिमानास्पद असलेल्या माझ्या एकवीस वर्षांच्या कामगिरीची पूर्ण बदनामी केली जात होती.

आय अॅम अ ट्रोल – स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद – मुग्धा कर्णिक

मधुश्री प्रकाशन, पुणे

पाने – १४०, मूल्य – २०० रुपये.

 पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506

One Comment

Add a Comment

Your email address will not be published.