फेरफटका

वैचारिक मतभेद !!!   घरातील आणि स्वतःशी

          तापलेल्या उन्हाने अंगाची काहीली होत होती ,मस्त पैकी कूलर समोर जरा बसाव अणि टिव्ही वरच्या खर्या-खोट्या पेड़ न्यूज पहाव्या असा विचार करून टीव्ही चा रिमोट घेउन टिव्ही सरू करणार तितक्यात सौ.काऊ चा कानठळ्या बसावणाऱ्या  मृदू आवाजाने रिमोट तसाच हातात राहिला ,

           घरच्या होममिनिस्टर पुढे आपल कस चालणार ना  ,म्हणजे मी काही तस सौ ना घाबरत वगरे नाही पण मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मी आपल कायम नमतच घेतो ,आता तुम्हाला तर माहितच आहे  मी कोणतीही गोष्ट करतो ती कायम सामजिक उपयोगितेची जाणीव ठेऊन

.

            म्हणजे आपल थोड नूकसान झाल तरी हरकत नाही पण आपल्या प्रत्येक कृतीतून समाजाचा काही तरी फायदा व्हावा एवढीच आपली माझी भूमिका असते, आता बघाना अजून पण मला तम्बाखू खाताना पाहून मोठे बंधू मला टोमणे मारत असतात ,पण माझी भूमिका असते की मी तम्बाखू व्यसन म्हणून खातच नाही मुळी त्या तम्बाखू  कंपनीत काम करणाऱ्या गरीब बिचाऱ्या भोळ्या भाबड्या कामगाराचं पोट पाणी चालावं ,तम्बाखू  मुळे खोकला किवा श्वसनाचे आजार होऊ शकतात  पण मीपणा व उदात्त विचार महत्वाचे ना ,लाखो रुपये खर्च करून डॉक्टर बनलेल्या देश बांधवाना पण मदत होते असे अनेक उददात्त विचार मला कायम तम्बाखू कडे आकर्षित करतात  म्हणून हा सगळा उपद्व्याप. म्हणजे तंबाखू  चे समर्थन नाही करत मी आणि तसा कोणी आरोप पण करू नये अस आपल मला माझ्या मनातून वाटत, ते काही पण असो विषय तो नहिए ,म्हणजे मी किवा सौ किवा तंबाखू हा  विषयच नहिए विषय होता वैचारिक मतभेद ,बरोबर ना

           काय ! झाले का तुमच मतभेद करण सुरु?  म्हणजे मत आसवी, म्हणजे प्रत्येकाला मत असायलाच पाहिजे आणि ते व्यवस्थित जरी नाही पण किमान मनातल्या मनात तरी मांडता आली  पाहिजे अस माझ मत आहे, आणि तुम्ही तुमच पण मत मांडा बुवा,

          पण आपल्या विचारात भेद असला तरी आपण एकदेशीय आहोत इतका विचार तो बनता है ना !

          आता ही पण गोष्ट खरी आहे की तंबाखू किवा सिगरेट चे दुष्परिणाम हे व्यसन करणाऱ्यावर जितके होतात त्या पेक्षा जास्त  समाजावरच जास्त होत असतात ,अस्वच्छता किवा पिचकार्या मुळे लोकांना होणारा त्रास  ,वायू प्रदूषण ,त्याच बरोबर आपल्या पाकिटावर होणारा अतिभार हे पण लक्षात घ्यायला हाव .

  पण आपण स्वतःशी मतभेत करू शकतो का ? स्वतःशी स्वतः भांडू शकतो का ? किवा इतराशी जशी स्वतःची तुलना करत आसतो तशीच स्वताःशी तुलना करू शकतो का ? बघा अएकदा विचार करून आपल्याच मनात एखदा फेरफटका मारून .

फेरीवाला अप्पाजी..

*तम्बाखू सेवन/धुम्रपान  आरोग्यास हानिकारक आहे ,लेखक त्याचे समर्थन करत नाही