गुढी पाडवा हा हिंदू नववर्ष दिन आहे का?

*गुढी पाडवा हा हिंदू नववर्ष दिन आहे का?*
“हिंदू आहे हिंदूच राहणार नव वर्षाच्या शुभेच्छा पाडव्यालाच देणार” किंवा “संभाजी राजांच्या मृत्यूचा दिवस सण म्हणून साजरा करू नका” वगैरे असल्या काही भंपक पोस्ट वारंवार वाचनात येतात.
काही स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणारे लोक्स गुढी पाडवा म्हणजे हिंदू नव वर्ष दिन हा खोडसाळ प्रचार करीत आहेत, तर ब्रिगेड वगैरे लोक्स त्याचा संभाजी राजांच्या मृत्यूशी सबंध जोडण्याचा धादांत मूर्ख प्रयत्न करीत आहेत.

( अधिक माहितीसाठी वाचा लिंक १ )

भारतात हिंदू संस्कृतीनुसार अनेक चांद्र-सौर कॅलेंडर आहेत त्यानुसार कालगणना करणारे आणि सण साजरे केले जातात. शिवराज्याभिषेक शक यांसारखे त्या त्या प्रदेशातील राजांनी त्या त्यावेळी सुरु केलेल्या कालगणना असंख्य आहेत. बरेच कॅलेंडर काळाच्या ओघात वापरणे बंद झाले आहे, म्हणून एकच एक असा कोणताही दिवस वर्षांचा सुरुवातीचा दिवस म्हणून स्वीकारणे अशक्य आहे. (लिंक २)

गुढीपाडवा हा सण केवळ सातवाहन राज्याच्या आणि प्राकृत भाषेच्या प्रभाव क्षेत्रात साजरा केला जातो. याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या वरील लेखात दिली आहेच. सातवाहन राजे हे वैदिक कि अवैदिक? ते आजच्या हिंदू लोकांप्रमाणे होते का याचा उहापोह अनेक इतिहास तज्ञांनी केला आहे. (याबद्दल चर्चा करणारा Sanjay Sonawani सरांचा लेख  लिंक ३)

गुढीपाडवा हा सण केवळ सातवाहन राज्याच्या आणि प्राकृत भाषेच्या प्रभाव क्षेत्रात साजरा केला जातो. याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या वरील लेखात दिली आहेच. सातवाहन राजे हे वैदिक कि अवैदिक? ते आजच्या हिंदू लोकांप्रमाणे होते का याचा उहापोह अनेक इतिहास तज्ञांनी केला आहे.

*निरीक्षण :* वरील माहितीवरून हे लक्षात येईल कि गुढी पाडवा सण हे सातवाहन राज्यात सुरु झालेल्या प्राकृत भाषिकांच्या सणाचे महाराष्ट्रातील स्वरूप आहे. इतर प्रदेशातील त्याची नावे वेगवेगळी आहेत. जिथे हा दिवस नव वर्ष दिन म्हणून साजरा केला जात नाही, तिथले हिंदू इतर दिवस नव वर्ष दिन म्हणून साजरे करतात.

( संदर्भ  लिंक ४)

*निष्कर्ष:* महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास गुढी पाडवा या सणाला मराठी नववर्षदिन म्हणणे योग्य ठरेल.

१ .  

२.  

३. 

४. 


GUTE-URLS

Wordpress is loading infos from facebook

Please wait for API server guteurls.de to collect data from
www.facebook.com/Eagle09115/pos...

Add a Comment

Your email address will not be published.