आपल्याला काय महत्वाच वाटत?

मोदी व्हाइट हाऊसवर उतरले तेव्हा परंपरेप्रमाणे गार्ड ने मोदींच्या पत्नीसाठी गाडीचा दरवाजा उघडून धरला. बराच वेळ वाट पाहूनही त्या दरवाज्यातून कोणीच खाली उतरलं नसल्याने गार्डचा भ्रमनिरास झाला असावा.
पत्नी असूनही राष्ट्राध्यक्षांच्या 10-5 गर्लफ्रेंड असणे कॉमन मानणाऱ्यांच्या देशात देशसेवेसाठी (!) पत्नीचा त्याग करणारा प्रधानसेवक विजोड वाटल्यास नवल नाही.

आपली सामाजिक मानसिकता दांभिक आहे. महानतेच्या व्याख्या तकलादू आहेत. आपल्याकडे ‘दिसणे’ हे ‘असण्या’ पेक्षा जास्त महत्वाचे असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना आपण कधीच महत्व देत नाही. ज्यांचा विचारही करण्याची गरज नाही त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात..

आपण नोटबंदी का केली याचा जाब विचारण्यापेक्षा नेता 18 तास (!) काम करतो, योगा करतो यावर चर्चा रंगवणार.
3 वर्षांपूर्वी 14% GST ला विरोध करणारा नेता 28% GST कसं काय लादू शकतो याच्यापेक्षा आपल्याला तो काय 9 लाखांचा सूट घालतो, दीड लाखाचा मेकअप करतो, 34 हजारांचे मशरूम खातो यात जास्त रस असतो.

नेत्याने जनतेला भूलथापा देऊन सरळ सरळ फसवल्यास आपली तक्रार नसते. पण त्याच्या कथित शुचितेवर व राहणीवर आपलं अधिक लक्ष असतं. जीन्स, टी शर्ट घालून आपले नेते स्टेजवरून भाषण देऊ शकत नाहीत. पण त्यांनी भ्रष्टाचार केल्यास आपली फारशी हरकत नसते.

असल्या दांभिक सामाजिक मानसिकतेमुळे आपले नेते आपला दुटप्पीपणा लपवत नाहीत, भ्रष्टाचार लपवत नाहीत, पण प्रेमप्रकरणे लपवतात. ‘स्नुपगेट’ सारखी प्रकरणे चिरडून टाकली जातात. काही नेते ‘ब्रह्मचारी’ राहतात. तर काही पत्नीचा त्याग हे महानतेचे प्रतीक म्हणून प्रोजेक्ट करतात. गुड गव्हर्नन्स सारख्या फालतू गोष्टी प्रोजेक्ट करण्याची गरजच काय !!

Add a Comment

Your email address will not be published.